ताज्या बातम्या

Breaking : पुलवामात चेकपोस्टवर तैनात जवानांवर दहशतावाद्यांनी केला हल्ला

गोंगू क्रॉसिंग परिसरातील एका चेकपोस्टवर पोलीस आणि सुरक्षा दलाचं पथक तपास करत होतं.

Published by : Sudhir Kakde

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा भागात (Pulwama) आज पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) झाल्याची माहिती समोर आली आहे. या दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद झाला. गोंगू क्रॉसिंग परिसरातील एका चेकपोस्टवर पोलीस आणि सुरक्षा दलाचं पथक तपास करत होतं. त्यानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा यंत्रणेच्या जवानांवर गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे सहायक उपनिरीक्षक विनोद कुमार गंभीर जखमी झाले. रुग्णालयात नेलं असता त्यांचा मृत्यू झाला. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे.

हल्ल्यात एएसआय विनोद कुमार शहीद झाल्याचं सांगण्यात येतंय. पाच दिवसांपूर्वी श्रीनगरच्या लाल बाजार भागातील चेक पोस्टवर दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केला होता. यामध्ये जम्मू-काश्मीर पोलिसमधील एएसआय मुश्ताक अहमद शहीद झाले होते. यावर्षी विविध ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 9 पोलीस शहीद झाले आहेत. 11 जुलै रोजी पुलवामामध्येच जैश-ए-मोहम्मदचा कमांडर कैसर कोकासह दोन दहशतवादी ठार करण्यात आले होते. कोका अनेक दहशतवादी घटनांमधील वॉन्टेड होता. वृत्तानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये यावर्षी 125 दहशतवादी मारले गेले आहेत. यातील 34 दहशतवादी पाकिस्तानी होते. तर जून महिन्यात 34 दहशतवादी मारले गेले.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये 141 सक्रिय दहशतवादी असून, त्यापैकी 82 विदेशी असल्याचं सांगण्यात येतं. दहशतवादी संघटना सध्या जम्मू-काश्मीरमध्ये लहान आणि आधुनिक शस्त्रे आयात करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असं अहवालात म्हटलं आहे. नुकत्याच झालेल्या चकमकीत अशी आधुनिक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप