PM Narendra Modi Team Lokshahi
ताज्या बातम्या

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, माजी पोलीस अधिकाऱ्यासह दोघांना अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, माजी पोलीस अधिकाऱ्यासह दोघांना अटक

Published by : Siddhi Naringrekar

पंतप्रधान मोदींविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोदींवर होणाऱ्या हल्ल्याचा कट बिहार पोलिसांनी उधळून लावला आहे. पाटण्यातून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून यातील एकजण माजी पोलीस अधिकारी असल्याची माहिती आहे.

या कटानुसार भारताला २०४७ पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा कट रचला जात होता. याचाच भाग म्हणून पंतप्रधान मोदींना १२ जुलैच्या दौऱ्यात लक्ष्य करण्याच्या कटाचाही समावेश होता. अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांची नावं अथर परवेज व मोहम्मद जलालुद्दीन अशी आहेत.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संशयित दहशतवाद्यांचं १५ दिवसांचं प्रशिक्षण फुलवारी शरिफ येथे झालं. त्यांनी ६ व ७ जुलैला पंतप्रधान मोदींवर हल्ला करण्याचा कट रचण्यासाठी बैठक घेतली. याची माहिती मिळताच लगेच त्याठिकाणी पोहचून पोलिसांनी ११ जुलैला फुलवारी शरिफ येथे धाड टाकली. यावेळी पोलिसांना घटनास्थळावरून काही कागदपत्रे मिळाली. यात ‘२०४७ पर्यंत भारत एक इस्लामिक राष्ट्र’ नावाचे कागदपत्र सापडले. याशिवाय २५ पीएफआय पॅम्प्लेटही पोलिसांना मिळाली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?