Thackeray Bandhu Yuti Exclusive : राज्यात सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरवात झाली त्यानंतर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. प्रमुख पक्ष युती आणि आघाड्यांचे गणित जुळवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. ठाणे, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड यासह एकूण 29 महानगरपालिकांची निवडणूक सोबत होत आहे. या निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी केली जाईल. यानंतर प्रत्येकाला प्रश्न होता की ठाकरेबंधूची युती कधी होणार, आज वरळीतील येथील हॉटेल ब्ल्यू सी येथे दुपारी 12 वाजता ठाकरेबंधूनी पत्रकार परिषदेत घेत युतीची घोषणा केली आहे.
पत्रकार परिषदेला येण्यापुर्वी दोन्ही बंधू हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दाखल झाले होते. तिथे त्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. अभिवादानंतर दोघांनी एकाच गाडीतून प्रवास करत एकत्र पत्रकार परिषद स्थळी केले होते. अखेर ठाकरेबंधूची युती झाली आहे.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की... "कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. सध्या महाराष्ट्रात मुलं पळवण्याची टोळी आहे. त्यामध्ये आता आणखीन दोन पक्ष अजून सामील झाली आहे.त्यामुळे मुबंईत महापौर मराठीचाच होणार आणि तो आमचाच होणार" असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
5 जुर्लैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकामंचावर उपस्थितीत होते. तो दिवस प्रत्येक शिवसेना ठाकरे गट आणि मनसैनिकांसाठी ऐतिहासिक दिवस ठरला आहे. त्यानंतर मात्र ठाकरेबंधूची वांरवार भेटीगाठी सुरु होत्या. प्रत्येक सणासुदीला दोघेबंधू भेटत होते. तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र निवडणूक लढणार आहेत. काल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी ट्विट टाकत पत्रकार परिषदेची माहिती दिली होती. राऊत यांनी या युतीच्या घोषणेची अधिकृत तारीखदेखील सांगितली होती.
थोडक्यात
पत्रकार परिषदेला येण्यापुर्वी दोन्ही बंधू हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दाखल झाले होते.
तिथे त्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.
अभिवादानंतर दोघांनी एकाच गाडीतून प्रवास करत एकत्र पत्रकार परिषद स्थळी केले होते.
अखेर ठाकरेबंधूची युती झाली आहे.