महाराष्ट्रातील मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणार्या 29 महापालिका निवडणुकीचे मतदान 15 जानेवारीला होईल आणि निकाल 16 जानेवारीला जाहीर होणार आहेत. यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) एकत्रितपणे जाहीरनामा प्रकाशित करण्याची तयारी चालू आहे. त्यात एक मोठी बातमी आहे - मनसे प्रमुख राज ठाकरे 20 वर्षांनी शिवसेना भवनात पाऊल ठेवणार आहेत.
16 मुद्द्यांचा जाहीरनामा
आद्य आणि अमित ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी 16 मुद्द्यांवर आधारित एक प्रेझेंटेशन दिलं, ज्यात मुंबईच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले होते. या जाहीरनाम्यात घरमालकांसाठी प्रॉपर्टी टॅक्स माफ, वीज बिल सवलत, बेस्ट बसचे दर कमी करणं आणि पाळणाघर सुविधा यांसारख्या घोषणा अपेक्षित आहेत.
राज ठाकरे शिवसेना भवनात
आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र जाहीरनामा प्रकाशित करणार आहेत. यामध्ये राज ठाकरे 20 वर्षांनी शिवसेना भवनात पाऊल ठेवतील, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा विषय आहे. या घोषणांमध्ये घरकाम करणाऱ्या महिलांसाठी आर्थिक मदत, कोळी महिलांसाठी 10 रुपयांत जेवण, तरुणांसाठी रोजगार निधी, तसेच बेस्ट बसचे तिकीट दर स्थिर ठेवण्याच्या घोषणाही अपेक्षित आहेत.
घोषणांमध्ये काय असेल?
700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफी
100 युनिट वीज मोफत
महिला आणि तरुणांसाठी आर्थिक मदत
सार्वजनिक वाहतुकीसाठी बसचे तिकीट दर ५-१० रुपयांपर्यंत
पालिकेच्या शाळांमध्ये ज्युनिअर कॉलेजची सुरूवात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य ग्रंथालय आणि मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
संजय राऊत यांचे मत
संजय राऊत यांनी सांगितलं की, आज राज ठाकरे शिवसेना भवनात येणार आहेत आणि दोन्ही ठाकरे बंधू कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईतील विविध शाखांना भेट देत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणार आहेत. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंचे एकत्रित प्रचार सुरू आहे आणि जाहीरनाम्यात विविध लोकाभिमुख घोषणा असण्याची शक्यता आहे.