शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सहपरिवार गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाणार आहेत. आज सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसाचा गणपती विराजमान होणार आहे. या गणेशोत्सवात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना गणपती दर्शनासाठी फोन करुन निमंत्रण दिलं असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे गणपती राज ठाकरे यांच्या घरी विराजमान झाल्यानंतर पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे हे सहपरिवार राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दर्शनासाठी आले आहेत.
सध्या राज्यात ठाकरे बंधु एकत्र येणार असल्याच्या चर्चा आता सत्यात उतरताना पाहायला मिळत आहेत. नुकतीच झालेली बेस्ट निवडणुक देखील दोघांनी एकत्र मिळून लढवली. त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे सहपरिवार राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. या गणेशोत्सवात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना गणपती दर्शनासाठी फोन करुन निमंत्रण दिलं असल्याची माहिती मिळाली आहे. उद्धव ठाकरे बाप्पाच्या दर्शनासाठी शिवतीर्थावर पोहचले आहेत, दरम्यान राजकीय वर्तुळावर चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.