काल दिशा सालीयन प्रकरणावरुन विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली बघायला मिळाली. याचवेळी चित्र वाघ आणि अनिल परब यांच्यामध्येही जुंपली होती. चित्रा वाघ यांनी अनिल परब यांच्यावर घणाघाती टीका देखील केली. त्यामुळे आता याच प्रकरणावरुन शिवसेना गटाच्या सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ आणि भाजपावर टीका केली आहे.
"कालच्या सभागृहातील जो अभूतपूर्व थयथयाट होता त्यामुळे या सभागृहाची गरिमा धुळीला मिळाली आहे. पण असा थयथयाट भाजपाला का करावा लागतो? भाजपाला या सगळ्याची गरज का आहे? 100 दिवस झाले तरी संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे पकडला गेला नाही. या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने फडणवीस आणि फडणवीस सरकारने केला आहे. तीन महिन्यात सगळं माहीत असूनही मराठा विरुद्ध ओबीसी अशी तेढ निर्माण केली. आणि त्यामुळेच भाजपा सरकार बॅकफुटवर गेले".