लाडकी बहीण योजने संदर्भात महिलांचे फसवणूक झाल्याचा आरोप करत ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याच पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या भव्य मोर्चा काढणार असून निवडणुकीआधी दीड हजार रुपये देत होते, 2100 रुपये देणार असं म्हणाले होते, आता 500 वर आलेत. असं म्हणत किशोरी पेडणेकरांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा जन्म झाला आणि निवडणूक होईपर्यंत बाळ सुदृढ होते. म्हणजेच त्या लाडक्या बहिणींना खुश ठेवण्यात आलं. पण निवडणूक झाल्यानंतर बाळाच्या पोटातील प्रोटीन काढण्यात आले. दीड हजार रुपये देत होते आणि आता 500 वर आले आहेत. त्यात पण नंतर ते 10 -12 तोंड वेगळं बोलणार ते वेगळ. पण ते 500 रुपयांपर्यंत आले".
" 2100 रुपये देणार असं म्हणाले होते. तुम्ही आम्हाला जिंकून द्या, आम्ही तुम्हाला 2100 रुपये देऊ असं ते म्हणाले होते. मग ते 2100 रुपये कधी देणार ते आधी जाहीर करा. महिलांची अशी घोर फसवणूक करू नये. कारण, आता सामान्य महिलांच्या तोंडून आता यायला लागला आहे की हे खोटारडा सरकार आहे आम्हाला फसवणारे सरकार आहे", असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.