Thane q Team Lokshahi
ताज्या बातम्या

मुलीला फरफटत नेणारा ठाण्यातील 'तो' मुजोर रिक्षावाला गजाआड

ठाण्यातील मुजोर रिक्षावाल्याला अटक, दारुच्या नशेत मुलीला रिक्षातून फरफटत नेल्याची कबुली

Published by : Sagar Pradhan

राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना काल ठाण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्यात रिक्षा चालकाने मुलीला फरफटत नेण्याची घटना घडली होती. आज त्या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. दारुच्या नशेत हे कृत्य केल्याची कबुली आरोपी रिक्षाचालकानं दिली आहे.

काल सकाळी 7 वाजता एक विद्यार्थिनी बाजारपेठेत पायी जात असताना रिश्रा चालकानं तिच्याकडे पाहून अश्लील हावबाव केले. मुलीनं त्याला जाब विचारल्यानंतर रिक्षाचालकानं तिचा हात पकडून फरफटत नेलं. पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर दिघा भागात राहणाऱ्या या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. दादा उर्फ राजू आब्बायी विरंगनेलू वय 37 असे त्या आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. तो गणेश नगर ,दिघा येथे भाड्याच्या घरात राहतो. तो मुळचा आंध्रप्रदेशचा आहे. अशी माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या अतिरिक्त Psi अजित बडे यांनी चार टीम नेमून आरोपीस अटक केली.आरोपी सोबत पोलिसांनी आरोपीची रिक्षा देखील ताब्यात घेतली आहे.

या अटकेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील ट्विटकरून सरकार आणि पोलिसांचे कौतुक केले आहे. काल दुपारी ठाणे येथे एका हरामखोर विकृत रिक्षावाल्याने एका मुलीचा विनयभंग केल्याची घटना ३ः३० च्या आसपास घडली… @ThaneCityPolice नी २४ तासाच्या आत विकृताच्या मुसक्या आवळल्या असून त्याची रिक्षा देखील जप्त केलेली आहे..हे शिंदे-फडणवीसांचं सरकार आहे..महिला मुलींवर वाकड्या नजरेने पहाणार्यांची गय केली जाणार नाहीचं. असे ट्विट त्यांनी यावेळी केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा