ताज्या बातम्या

ठाणेकरांनो, घरातून बाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचाच; पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी

Published by : Siddhi Naringrekar

ठाणे - मुंबईत पावासाचा जोर वाढला आहे. काही ठिकाणी पाणी साचलं आहे. काही भागात भागात पावसाने रात्रीपासूनच जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईसह पश्चिम उपनगरात रिमझिम पाऊस सुरू आहे. ठाण्याकडून मुंबईला जाणाऱ्या या पूर्व द्रूतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोढी झाली आहे. शेकडो वाहने रस्त्यावर आहेत.

सुमारे दोन ते तीन किलोमीटरपर्यंत या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.कामावर निघालेल्या लोकांचे चांगलेच हाल होत आहेत.ठाणे जिल्ह्यात आजही मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान विभागाने मुंबईला येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मुंबईत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ठाण्याच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले; " ज्यांनी बाळासाहेबांना अटक..."

IPL 2024, CSK vs RR : चेन्नई सुपर किंग्जच्या प्ले ऑफच्या आशा पल्लवीत; राजस्थानचा ५ विकेट्सने केला पराभव

Daily Horoscope 13 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या आयुष्यात होतील सकारात्मक बदल; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 13 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"...तर तुम्हाला गुलामगिरीत राहावं लागेल"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंचा PM मोदींवर निशाणा