Ketaki Chitale Post on Pawar Team Lokshahi
ताज्या बातम्या

पवारांवरील लिखाण भोवले, अभिनेत्री केतकी पोलिसांच्या ताब्यात

Ketaki Chitale Arrested : पुणे, ठाणे येथे दाखल झाले होते गुन्हे

Published by : Team Lokshahi

अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) ही नेहमीच सोशल मीडियावरील (social media)आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत असते. अभिनेत्री यापुर्वीही अनेकदा वादग्रस्त विषयावर भाष्य करुन टीकेची धनी ठरली होती. आता पुन्हा एकदा शरद पवार यांना (sharad pawar)उद्देशून शेअर केलेल्या मजकूरवरुन कळवानंतर पुण्यात आणि गोरेगावमध्ये तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी कारवाई होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर आता केतकीला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राज ठाकरेंसह सर्वांनीच केतकी चितळे यांच्या लिखानासंदर्भात नाराजी व्यक्त करत तीव्र शब्दांत निषेध केला. राज ठाकरेंनी पत्रात लिहीलं की, कोणीतरी केतकी चितळे नामक आहेत. त्यांनी श्लोकासारखं काही तरी लिहून पोस्ट केलं. भावेंनी ते लिहील्याचं तिथे दिसतंय. हे जे काही लिहीलंय याला महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये जागा नाही असं राज ठाकरे म्हणाले.

पुण्यात गुन्हा दाखल

मराठी अभिनेत्री केतकी चितळे नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. यंदा तिनं थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत फेसबुकवर अक्षेपार्ह पोस्ट केली आहे . या प्रकरणी केतकीविरोधात ठाण्यात आणि पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान केतकी चितळे हिचा बोलविता धनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केली आहे. केतकी चितळे च्या वक्तव्याला फारस महत्व देण्याची गरज नाही त्या सोबत तिच्यावर कडक कारवाई देखील केली पाहिजे अशी मागणी विद्या चव्हाण यांनी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य