Thane Water Crisis  Thane Water Crisis
ताज्या बातम्या

Thane Water Crisis : मुख्य जलवाहिनी तुटल्याने 'या' तारखेपर्यंत ठाणेकरांना ५०% पाणी टंचाई सामना

ठाणे शहरातील मुख्य जलवाहिनीमध्ये बिघाड झाल्यामुळे १५ डिसेंबर २०२५ पर्यंत ५०% पाणी कपात लागू राहणार आहे. यामुळे ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा या भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

Published by : Riddhi Vanne

(Thane Water Crisis ) ठाणे शहरातील मुख्य जलवाहिनीमध्ये बिघाड झाल्यामुळे १५ डिसेंबर २०२५ पर्यंत ५०% पाणी कपात लागू राहणार आहे. यामुळे ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा या भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. प्रिस्ट्रेस काँक्रिट जलवाहिनीची दुरुस्ती खूप वेळ घेणारी आणि कठीण असते, म्हणून ही कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

बिघाड नेमका कुठे झाला?

ठाणे शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी कल्याण फाटा येथे महानगर गॅस कंपनीच्या कामामुळे तुटली आहे. या जलवाहिनीची दुरुस्ती सुरू असली तरी ती जुनी आणि क्लिष्ट आहे. त्यामुळे दुरुस्ती पूर्ण होण्यासाठी आणखी चार दिवस लागणार आहेत.

पाणीपुरवठ्याचे व्यवस्थापन

या समस्येमुळे ठाणे महानगरपालिका पाणी वितरणाचे नवे नियोजन करत आहे. १२ तासांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जाईल, ज्यामुळे प्रत्येक भागाला कमी पाणी मिळेल. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यात अनियमितता येईल.

विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यातील वाद

या पाणी कपातीवरून सत्ताधारी आणि विरोधक रस्त्यावर उतरले आहेत. भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी कळव्यात आंदोलन केले. त्यांनी महापालिकेच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केले, तर विरोधी पक्षांनी ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागांमध्ये निदर्शने केली. महापालिकेने नागरिकांना पाणी वाचवण्याचे आवाहन केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा