Jyoti Chandekar Passes Away : मराठी सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्टार प्रवाहावरील स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिका टीआरपीच्या शर्यतीत आघाडीची मालिका ठरलेली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने आपल्या मनात एक वेगळा जागा निर्माण केली आहे. त्यामधील एक म्हणजे पुर्णा आजी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी प्रक्षेकांच्या मनावर भुरळ पाडली होती. आज दुपारी 4 वाजता पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात वयाच्या ६९ वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसापासून ज्योती चांदेकर या आजारी असल्याची माहिती मिळत आहे. उद्या सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.
काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे त्या पुण्याला गेल्या होत्या. तिथल्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज मात्र दुपारी 4 वाजता ज्योती चांदेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. परंतू त्यांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आले आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडितची आई होती.
ज्योती चांदेकरांच्या कामाविषयी सांगण्याचे झाले तर, 1969 मध्ये ज्योती एका हिंदी चित्रपटाचं शूटिंग पाहायला गेल्या होत्या. त्यावेळी दिग्दर्शकाने लहान मुलींची गरज असल्याचं सांगून काही मुलींना बोलावलं. त्यावेळी ज्योती यांनी काही हिंदी संवाद वाचून दाखवले आणि दिग्दर्शकांच्या पसंतीस उतरल्या. त्यातूनच त्यांची पहिली हिंदी चित्रपटात भूमिका मिळाली. त्यानंतर त्यांना ‘सुंदर मी होणार’ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली आणि त्या नंतर त्यांनी अनेक गाजलेली नाटकं केली.