बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.
संतोष देशमुख खून प्रकरणातील 13 वी सुनावणी आज सकाळी 11 वाजता जिल्हा सत्र न्यायालयात पार पडणार आहे. 18 ऑगस्ट रोजी जी महत्त्वाची सुनावणी पार पडली त्यामध्ये वाल्मीक कराडच्या संपत्ती जप्तीचा निकाल लागणार का...? त्याचबरोबर इतर आरोपींनी दोष मुक्तीचा अर्ज केला आहे यावर न्यायालय काय निर्णय देते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.