कल्याणमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. दोन नराधमांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली आहे. कल्याणच्या बापगाव परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं?
ही चिमुकली दुकानातून खाऊ आणण्यासाठी पैसे घेऊन बाहेर गेली होती, परंतु ती घरी परत आलीच नाही. आठ ते नऊ तासांनी तिच्या कुटुंबाने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांना बापगाव परिसरात या चिमुकलीचा मृतदेह सापडला. या प्रकरणी पोलिसांनी एका रिक्षा चालकासह मुख्य आरोपीला अटक केली आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ कल्याणमधील नागरिक संतप्त झाले असून नागरिकांनी काळ्या पट्ट्या बांधून मूक मोर्चा काढला.
दरम्यान, कल्याणमधील अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कल्याणच्या आमदार सुलभा गायकवाड यांनी आरोपीला बदलापूर प्रकरणातील आरोपीला झाली त्याप्रमाणे शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. बदलापूर प्रकरणामध्ये आरोपी अक्षय शिंदेला ज्या पद्धतीने पोलिसांनी शिक्षा दिली त्याच पद्धतीने कल्याणमधील आरोपीला देखील शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे आमदार सुलभा गायकवाड मागणी करणार आहेत. दोन नराधमांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली आहे. कल्याणच्या बापगाव परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. यातील मुख्य आरोपीला अटकही करण्यात आली. या घटनेविरोधात संतप्त नागरिकांनी मोर्चा काढला आहे.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-