नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चिमुरडीवर अत्याचार करून तिची निघृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. १६ नोव्हेंबर रोजी गावातील २४ वर्षीय विजय संजय खैरनार याने या चिमुरडीवर प्रथम अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचून हत्या केली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे.
आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. त्या चिमुकलीच्या घराच्यांना सात्वंन भेटीसाठी रुपाली चाकणकर केल्या होत्या. यानंतर माध्यमांशी बोलत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
त्या म्हणाल्या की, "डोंगराळे भागातील चिमुरडीची हत्या ही संतापजनक आहे. केवळ अटक करणे हा भाग नसून महिला आयोगाच्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून काम करणार आहोत. हिंस्र सापांचा नायनाट करणार तसेच आरोपीला फाशीची शिक्षा होईल असेच करू. BNS चे नवीन तीनही कायदे ऑनलाईन पद्धतीने तक्रारी करतात. त्यात आता पूर्विकेक्षा कडक अतिशय कठोर असा कायदा आहे. आरोपीला फाशीच्या शिक्षा ही माणसांमधील ही विकृती नाहीशी करण्यासाठी काम करतोय. या घटनेमुळे असे वागणे साहजिक आहे. त्या व्यक्तीला वेदना काय आहेत ते समजले पाहिजे पण कायदा आहे. फास्ट्रॅक मधे जास्तीत जास्त वेळेवेळ मिटावे याचे सुरू आहे. लीगल हेड क्लिनिक हे सुरू केले आहे. आपल्याकडे बाल हत्या कायदा सुरू नाही.बाल हक्क आयोगाच्या नेमणूक कराव्यात अशी आम्ही मागणी करणार आहोत."
थोडक्यात
'चिमुरडीची हत्या संतापजनक..
आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी प्रयत्न करणार..
रूपाली चाकणकरांची मालेगाव हत्येप्रकरणी प्रतिक्रिया..