ताज्या बातम्या

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University: विद्यापीठात प्रवेश प्रक्रिया सुरू; 30 जूनपर्यंत अर्ज करता येणार

शैक्षणिक प्रवेश: मराठवाडा विद्यापीठात 2025-26 च्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू, CET शिवाय गुणवत्तेच्या आधारे प्रवेश.

Published by : Team Lokshahi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 45 विभागांमध्ये विविध पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 2025-26 या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया आजपासून (5 जून) औपचारिकरित्या सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना ई-समर्थ पोर्टलद्वारे 30 जून 2025 पर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.

प्रवेश प्रक्रिया 'सीईटी' शिवाय, गुणवत्तेच्या आधारे - यंदाही कोणतीही प्रवेशपूर्व परीक्षा (CET) न घेता, विद्यार्थ्यांच्या पदवीतील गुणवत्तेच्या आधारेच प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. विद्यापीठ प्रशासनाने कुलगुरू डॉ. विजय फुलारी व प्रकुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेशाचे वेळापत्रक निश्चित केले आहे. नोंदणीसाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देणे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गासाठी नोंदणी शुल्क 200 रुपये, तर राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये निश्चित करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या तारखा व टप्पे:

नोंदणी कालावधी: 5 ते 30 जून 2025

नोंदणी माहिती विभागांकडे सुपुर्द: 1 जुलै

कागदपत्र सादरीकरण: 5 जुलैपर्यंत

कागदपत्र पडताळणी: 14 जुलै

प्राथमिक गुणवत्ता यादी: 17 जुलै

आक्षेप नोंदणीसाठी कालावधी: 17-19 जुलै

सुधारित गुणवत्ता यादी: 21 जुलै

निवड यादी: 22 जुलै

प्रवेश निश्चिती: 23 ते 25 जुलै

2,225 जागांसाठी स्पर्धा -

विद्यापीठाच्या एकूण 51 पैकी 43 विभागांमध्ये 54 पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 2,228 जागा उपलब्ध आहेत. यावर्षी काही नवीन अभ्यासक्रमांनाही मंजुरी देण्यात आली आहे. परिणामी, पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अशा एकूण 60 अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाणार असल्याचे उपकुलसचिव माधव वागतकर यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांना सुचना:

प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा वेळेत आणि अचूक पार पाडणे अत्यंत आवश्यक आहे. माहिती अचूक भरावी आणि कागदपत्रांची तयारी ठेवावी. कोणतीही त्रुटी किंवा विलंब प्रवेश प्रक्रियेत अडथळा ठरू शकतो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा