सध्या संपुर्ण राज्यभर गाजलेली योजना म्हणजे महायुती सरकारनं महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहिण योजना. लाडकी बहीण योजनेवरुन अनेक चर्चा सुरु आहेत. लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांच्या बॅंक अकाऊंटमध्ये दरमहा पैसे जमा होतात. नुकताच फेब्रुवारी आणि मार्चचा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा झाल. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता हा ८ मार्च महिला दिनी देण्यात आला होता. त्यामुळे आता लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत ती एप्रिल महिन्याची, एप्रिल महिन्याचा हप्ता 6 ते 10 तारखे दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
'या' महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ नाही
अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली होती. ज्या महिलांची नावे योजनेतून बाद झाली आहेत त्या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत. या योजनेत एकूण 50 लाख महिला अपात्र होण्याची शकता असून आतापर्यंत 9 लाखाहून महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना या महिन्यात योजनेचा लाभ मिळाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.