अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याने संपूर्ण बॉलीवूड हादरलं आहे. त्यांच्या मुंबईतील घरात ही धक्कादायक घटना घडली. गुरुवारी मध्यरात्री अचानक हल्लेखोर त्यांच्या घरात शिरला. हल्लेखोराने सैफ अली खान यांच्यावर जीवघेणा चाकू हल्ला केला. या झटापटीत घरातील एक मदतनीस जखमी झाली आहे. या हल्लेखोराचा फोटो पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे. हल्लेखोराने हा हल्ला का केला याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
हल्लेखोराने एक कोटी रुपये मागितले असल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. सैफ अली खानच्या घरातील नर्स एलियामाने जबाब नोंदवण्यात आला आहे.
नर्स एलियामाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
सैफच्या घरातील स्टाफ नर्स एलियामाचा जबाब
- 15 जानेवारीला पहाटे 2 वा. सुमारास आवाज झाल्याने जाग आली.
- रूममधील बाथरूमचा दरवाजा उघडा दिसला, बाथरूमची लाईट सुरू होती.
- बाथरूमच्या दरवाज्यावर कॅप घातलेल्या इसमाची शॅडो दिसली.
- बाथरूममधून तो इसम बाहेर आला.
- तो जहांगीरच्या बेड जवळ जात होता. ते पाहून मी पण जहांगीर जवळ गेले.
- त्याने तोंडावर बोट ठेवून मला शांत राहण्यास सांगितले, 'नो आवाज' असं हिंदीत बोलला.
- जेहची आया जुनू झोपेतून उठली.
- तिलाही त्या इसमानं 'कोई आवाज नहीं, कोई बाहन नही जाएगा' असं बोलून धमकावलं.
- त्यावेळी जहांगीरला उचलायला गेली असता तो माझ्यावर धावून आला.
- त्याच्या डाव्या हातात लाकडासारखं आणि उजव्या हातात हेक्सा ब्लेडसारखं काहीतरी होतं.
- झालेल्या झटापटीत त्याने माझ्यावर हेक्सा ब्लेडनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
- त्या हल्ल्यात माझ्या दोन्ही हाताच्या करंगळ्या आणि मधल्या बोटाला जखम झाली.
- मी त्याला विचारले 'आपको क्या चाहीए' तेव्हा तो बोलला 'पैसा चाहीए' मी विचारले 'कितना चाहीए' तेव्हा तो इंग्रजीतून बोलला 'वन करोड'
- संधी साधून जुनू ओरडत रुमबाहेर गेली.
- तिचा आवाज ऐकून सैफ सर आणि करीना मॅडम धावत रुममध्ये आले.
- त्याला सैफ सरांनी 'कौन है, क्या चाहिए' असं विचारलं.
- त्यानं त्यावेळी लाकडासारखी वस्तू आणि हेक्सा ब्लेडनं सैफ सरांवर हल्ला केला.
- गीता मध्ये आली तेव्हा तिच्याशीही त्याने झटापट केली आणि हल्ला केला.
- सैफ सरांनी स्वत:ची सुटका करून घेतली.
- आम्ही सर्व रुममधून बाहेर पडून वरच्या माळ्यावर गेलो.
- आमचा आवाज ऐकून इतर स्टाफ तेथे आला.
- या सर्व गडबडीत तो इसम पळून गेला.
- त्या इसमानं काळ्या रंगाची पॅन्ट आणि गडद रंगाचं शर्ट आणि डोक्यावर कॅप घातली होती.