ताज्या बातम्या

Baby's Cord Care : प्रसूतीनंतर जपून ठेवा बाळाची नाळ; भविष्यात गंभीर आजारांवर होऊ शकतो रामबाण उपाय

नाळीतील रक्तात स्टेम सेल्स असून त्या शरीरात नवीन पेशी तयार करण्याचं काम करतात.

Published by : Team Lokshahi

आईच्या पोटात नऊ महिने असणाऱ्या बाळाला सर्व पोषण नाळीद्वारे मिळते. डिलिवरीनंतर ही नाळ बाळापासून विलग केली जाते. तिच्यातील रक्त टाकून दिलं जातं. मात्र, तज्ज्ञ सांगतात की, जर नाळीतलं रक्त (कॉर्ड ब्लड) जपवून ठेवलं, तर ते भविष्यात बाळाच्या गंभीर आजारांवर प्रभावी उपचारासाठी उपयोगी ठरू शकतं.

नाळीतील रक्तात स्टेम सेल्स असतात –

नाळीतील रक्तात स्टेम सेल्स असून त्या शरीरात नवीन पेशी तयार करण्याचं काम करतात. या स्टेम सेल्सचा उपयोग कर्करोग, रक्ताचे विविध आजार आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्यासारख्या गंभीर स्थितींवर उपचारासाठी केला जातो.

काही मर्यादाही

डिलिवरीवेळी मिळणाऱ्या स्टेम सेल्सची संख्या कमी असू शकते, आणि जर कुटुंबाला काही विशिष्ट अनुवांशिक आजारांचा धोका असेल, तर हे स्टेम सेल्स नेहमी उपयोगी पडतीलच असं नाही. काहीवेळा दुसऱ्या स्त्रोतांमधून स्टेम सेल्स घ्यावे लागतात.

कोण करू शकतं साठवण?

जोडपं जर बाळाच्या जन्माची वाट पाहत असेल, तर ते डिलिवरीच्या वेळी नाळीतील रक्त सुरक्षितपणे साठवू शकतात. सध्या याचा उपयोग लिम्फोमा, ल्युकेमिया, थॅलेसेमिया, सिकल सेल अॅनिमिया आणि प्रतिकारशक्तीशी संबंधित विकारांवर केला जात आहे.

कॉर्ड ब्लड बँकिंग म्हणजे काय?

डिलिवरीनंतर नाळीतील रक्त विशेष तंत्रज्ञानाच्या मदतीने साठवून सुरक्षित ठेवलं जातं. याला 'कॉर्ड ब्लड बँकिंग' म्हणतात. हे जणू आरोग्याचं बँकिंगच आहे. भविष्यात बाळाला किंवा कुटुंबातील सदस्यांना जर गंभीर आजार झाला, तर याच साठवलेल्या स्टेम सेल्सच्या मदतीने उपचार शक्य होतो.

फायदे कोणते?

साठवणं सोपं आणि तुलनेत कमी खर्चिक

संसर्गाचा धोका अतिशय कमी

भविष्यात गंभीर आजारांवर जलद उपचाराची शक्यता

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा