टी-20 विश्वचषक 2026 मधील भारताविरुद्धचा सामना न खेळण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतल्यानंतर या मुद्द्यावर बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले की, आयसीसीशी चर्चा होईपर्यंत भारतीय मंडळ कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देणार नाही.
पाकिस्तान सरकारने 15 फेब्रुवारीला होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यात संघ उतरणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, स्पर्धेतील इतर सर्व सामने पाकिस्तान खेळणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
या निर्णयावर आयसीसीने नाराजी व्यक्त करत निवडक सामने खेळणे हे आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या तत्त्वांना धरून नसल्याचे सांगितले. सर्व संघांनी समान नियमांनुसार मैदानात उतरावे, असा स्पष्ट संदेश आयसीसीने दिला आहे. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध मालिका जिंकून भारतीय संघ आत्मविश्वासात असून ७ फेब्रुवारीपासून आपल्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात करणार आहे.
थोडक्यात
पाकिस्तानने टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारताविरुद्ध सामना न खेळण्याचा निर्णय घेतला.
बीसीसीआयने या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) च्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी प्रतिक्रिया दिली.
आयसीसीशी चर्चा पूर्ण होईपर्यंत बीसीसीआय कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देणार नाही, असे स्पष्ट केले.
आयसीसीच्या चर्चेनंतरच पुढील भूमिका जाहीर केली जाणार.