ताज्या बातम्या

Air India plane crash : विमान दुर्घटना पाहिल्यानंतर व्हिडीओ काढणाऱ्या मुलाने घेतला धसका, म्हणाला...

गुजरातमधील विमान दुर्घटनेने संपूर्ण देश हादरून गेला असतानाच, या अपघाताचा व्हिडीओ मोबाईलमध्ये टिपणाऱ्या एका तरुणाची प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Published by : Prachi Nate

गुजरातमधील विमान दुर्घटनेने संपूर्ण देश हादरून गेला असतानाच, या अपघाताचा व्हिडीओ मोबाईलमध्ये टिपणाऱ्या एका तरुणाची प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. बारावीत शिकणाऱ्या आर्यन असारी या विद्यार्थ्याने संपूर्ण दुर्घटनेचे दृश्य मोबाइलमध्ये टिपले, मात्र त्यानंतर तो मानसिक धक्क्यात असून तो म्हणतो, "आता कधीच विमानात बसणार नाही."

दुर्घटनेनंतर पोलिसांकडे जबाब नोंदवल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आर्यन म्हणाला, "मी विमान टेक-ऑफ करताना होणारा आवाज कधीच ऐकला नव्हता. इतक्या जवळून विमान उडताना मी पहिल्यांदाच पाहत होतो. माझ्या वडिलांनी मला ते दाखवायला सांगितलं होतं. गावातील मित्रांना दाखवण्यासाठी मी टेरेसवर जाऊन काही व्हिडिओ शूट करायचे ठरवलं होतं. पण, विमान कोसळल्याचा व्हिडीओ मी काढेन, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं."

आर्यनच्या म्हणण्यानुसार, "विमान हवेत झेपावत असतानाच अचानक तो घसरू लागला आणि काही क्षणांतच मोठा स्फोट झाला. माझे हात थरथरत होते. ते दृश्य अजूनही डोळ्यांसमोरून जात नाही. मी रात्री झोपूही शकत नाही. आता कोणी कितीही सांगितलं तरी मी विमानात कधीच बसणार नाही." आर्यनने टिपलेला व्हिडीओ तपास यंत्रणांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या व्हिडीओतून दुर्घटनेपूर्वीच्या काही क्षणांचा तपशील मिळण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आर्यनकडून अधिक माहिती घेतली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा