महाराष्ट्रात 6 जानेवारी हा दिवस ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचं श्रेय जाते बाळशास्त्री जांभेकर यांना, ज्यांनी 1832 साली ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया घातला. तेव्हाची पत्रकारीता आणि आताच्या पत्रकारितेत खूप मोठा आहे. कारण आधी फक्त पत्रकार सांगितलं म्हणजे भल्याभल्यांना घाम फुटायचा. मात्र, तेच पत्रकार आजच्या काळात असुरक्षित आहे.
छत्तीसगडमध्ये पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येने खळबळ
नुकताच छत्तीसगडच्या बिजापुरात पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह आढळून आला होता. चंद्राकार हे स्वतंत्र पत्रकारिता करायचे. त्यांचं यूट्यूब चॅनल होतं. त्या माध्यमातून त्यांनी अनेक घोटाळे उघडकीस आणले. चंद्राकर यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेश चंद्राकरला एसआयटीच्या पथकानं हैदराबादहून अटक केली आहे. आरोपी सुरेश हैदराबादमध्ये त्याच्या चालकाच्या घरी लपलेला होता. त्याआधी तो सातत्यानं लोकेशन बदल होता.
पत्रकार मुकेश चंद्राकर यांची निर्घृणपणे हत्या
पत्रकार मुकेश चंद्राकार यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्यातून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुकेश यांच्या डोक्याच्या मागील भागात ४ इंच खोल जखम आढळून आली आहे. त्यांच्या डोक्याच्या वरील भागात २ वार झालेले आहेत. छातीवर झालेला एक वार ५ इंच खोल आहे. मुकेशचा मृत्यू झाल्यानंतरही त्याला अतिशय बेदम मारण्यात आलं. शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे.
मुकेश चंद्राकर यांची का झाली हत्या?
पत्रकार मुकेश चंद्राकर यांनी ठेकेदार सुरेश चंद्राकर यांनी केलेला घोटाळा उघडकीस आणला होता. सुरेश चंद्राकर यांना बस्तरमध्ये 120 कोटींचं रस्ते बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. त्यानंतर एक जानेवारीपासून मुकेश चंद्राकर यांचा कुठेही पत्ता लागला नाही. पत्रकार मुकेश यांची हत्येची बातमी आल्यानंतर पोलिसांनी ठेकेदार सुरेश चंद्राकारच्या दिशेन तपास सुरू केला. मुकेशला शेवटीचा कॉल हा सुरेश चंद्रकारचा भाऊ रितेशने केला होता. त्यानंतर एक जानेवारीपासून ही मुकेश चंद्राकरचा फोन बंद होतो. मुकेश यांची निर्घृण हत्या करून त्यांचा मृतदेह सॅप्टीक टँकमध्ये टाकून त्यावर प्लॅस्टर करण्यात आलं होतं.
याआधीही काही पत्रकारांच्या हत्या
पत्रकाराची इतक्या अमानुषपणे हत्या करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही बऱ्याच पत्रकारांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.
आतापर्यंत कुणा-कुणाची हत्या?
उत्तर प्रदेश - 2015 - जगेंद्र सिंग
उत्तर प्रदेश - 2016- करुण मिश्रा
उत्तर प्रदेश - 2016 - शुभम मणी त्रिपाठी
बिहार - 2016 - रंजन राजदेव
मध्य प्रदेश - 2016- संदीप शर्मा
बंगळुरु - 2017- गौरी लंकेश
बिहार - 2022- शुभाश कुमार महतो
महाराष्ट्र (रत्नागिरी) - 6 फेब्रुवारी 2023 - शशिकांत वारिशे
उत्तर प्रदेश (जौनपूर) - 13 मे 2024 - आशुतोष श्रीवास्तव
छत्तीसगड - 3 जानेवारी 2024 - मुकेश चंद्राकर
सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-