ताज्या बातम्या

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 4 फेब्रुवारीला सादर होणार

Published by : Siddhi Naringrekar

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 4 फेब्रुवारीला सादर होणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची प्रशासकाची नेमणूक केल्यानंतर ते प्रथम प्रशासक म्हणून अर्थसंकल्प सादर करणार आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांना काही कारणास्तव बाहेर जावे लागत असल्याने त्यांनी अर्थसंकल्प सादरीकरणाची तारीख पुढे ढकलावी लागल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सन २०२२-२३ अर्थसंकल्प सादर करताना सुमारे सात हजार कोटींची वाढ करत ४५ हजार ९४९ पूर्णांक २१ कोटींचा असा ८ पूर्णांक ४३ कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. सन २०२१-२२चा ११.५१ कोटी रुपये शिलकीचा ३९ हजार ०३८कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता.

एप्रिल १९८४ मध्ये द.म.सुखटणकर यांची पहिले प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तर पुढे १२ नोव्हेंबर १९८४ ते ०९ मे १९८५ या कालावधीत जे.जी. कांगा यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे फेब्रुवारी १९८५मध्ये जे.जी. कांगा यांनी प्रशासक म्हणून अर्थसंकल्प मांडला होता. इक्बालसिंह चहल यांची प्रशासकाची नेमणूक केल्यानंतर ते प्रथम प्रशासक म्हणून अर्थसंकल्प सादर करणार आहे.

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...