ताज्या बातम्या

वीज पडून बंगल्याला तडे, तर अनके घरातील टीव्ही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जळून खाक

सांगलीच्या मिरजेतील बोलवाड या ठिकाणी एका घरावर वीज पडल्याची घटना घडली आहे.

Published by : shweta walge

संजय देसाई, सांगली : सांगलीच्या मिरजेतील बोलवाड या ठिकाणी एका घरावर वीज पडल्याची घटना घडली आहे. यामध्ये घराला तडे गेले आहेत, तर वीज पडल्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित होऊन अनेक घरातील टिव्ही व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळाल्या आहेत.

सोमवारी रात्रीच्या सुमारास मिरज तालुक्यातल्या बोलवाड या ठिकाणी एका बंगल्यावर वीज पडल्याची घटना घडली आहे. यामध्ये सुरेश खरात यांच्या घराच्या भिंतीला मोठे तडे गेले आहेत त्याच बरोबर घरातील सर्व वायरिंग जळून खाक झाली आहेत. मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी या ठिकाणी झाली नाही, मात्र दुसऱ्या बाजूला वीज पडल्याने या परिसरातील विजेचा पुरवठा अचानकपणे खंडित झाला आहे. विजेचा दाब प्रचंड वाढल्याने त्याठिकाणे असणारे वीज वितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मर उडाल्याने परिसरातल्या 6 ते 7 घरातील टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे खाक झाली आहेत. तर विज पडल्याने प्रचंड आवाज या परिसरामध्ये निर्माण झाल्याने नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Fake Crop Insurance : नांदेडमधील 'बोगस' पीक विमा घोटाळा उघड; बीडचे 9 एजंट, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावानेही विमा

Saamana Editorial : 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांनी...'; 'सामना'तून सरकारवर साधला निशाणा

Shubhanshu Shukla Axiom 4 : शुभांशु शुक्लानं ISS च्या कक्षेत पूर्ण केला एक आठवडा; सांगितलं पुढील कामाचं नियोजन