मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज राज्यस्तरीय बॅंकर्स समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडे वारंवार होणाऱ्या सी- बीलावरुन बॅंकाना चांगलेच सुनावले आहे. शेतकऱ्यांसाठी आणि या योजनांमध्ये काम करणाऱ्यांना व्यक्तींची नावे द्या, त्यांना सन्मानित करा, बैठकीत फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली.
"शेतकऱ्यांना सीबिल मागू नका, हे वारंवार सांगितले, तुम्ही तरी मागता. त्यावर तोडगा सांगा. आम्ही अशा बँकावर एफआयआर पण केले. पण तुम्हालाच हे गांभीर्याने घ्यावे लागेल. रिझर्व्ह बँकेने सुद्धा स्पष्ट केले आहे, जर कोणती बँक शाखा सी-बिल मागत असेल तर त्या शाखेवर कारवाई करण्यात येईल, असा निर्णय मला आज हवा आहे, असे मुख्यमंत्री फडणवीसांनी बॅंकाना खड्डे बोल सुनावले आहेत.