मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आंदोलनाचा स्वर अधिक तीव्र झाला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या जरांगेच्या भेटीस आझाद मैदानावर गेल्या होत्या. दरम्यान सुप्रिया सुळे यांनाआंदोलकांनी घेरलं होतं. आझाद मैदानावर सुप्रिया सुळेंची गाडी अडवली होती. त्यांच्या गाडीसमोर मराठा आंदोलकांनी घेराव घालत केली घोषणाबाजी करत होते. "शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळ केलं ताई" मराठा आंदोलकांचे म्हणणे आहे. याचपार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
त्यावेळी ते म्हणाले की, "मराठा समाजातील एक सांग आहे की, कोणताही नेता आला. तो भाजपचा येईल तो विरोधी पक्षातील येईल. आपल्या पोरांनी त्या नेत्यांला ताण देऊ नका. आपल्या व्यासपीठावर आलेला आपला दुश्मन जरी असला तरी त्याला सन्मान द्यायला शिका. मला पत्रकारांनी सांगितलं कोणीतरी मोठा गोंधल घातला. नेते आल्यावर तुम्ही गोंधळ घालणार असाल, तर तुमच्याकडे कोणी येणार नाही. ज्यावेळी आपल्याला वाटेल की आरक्षण देतं नाही, त्यावेळी काय करायचे पाहू. आता सर्व जबाबदारी तुमच्यावर आहे. कोण आहेत ते गोंधळ घालणारे त्याच्याकडे पाहावं लागेल, तसा व्हिडिओ असेलच की, हे सगळे सरकारने पाठवलेली मुलं आहेत, माझी मुलं असं करु शकतच नाही."