ताज्या बातम्या

Crime News : नवरा-नवरीचं लग्न झालं, मधुचंद्राच्या रात्री असं काही झालं की..., ऐकून थक्क व्हाल

नवरा-नवरीचं लग्न झालं. दोन्ही कुटुंब आनंदात होती. सर्व विधी पार पडून नवरी मुलीला सासरी आणलं. पण मधुचंद्राच्या रात्री असं काही झालं की, दोन्ही कुटुंबांचा आनंद क्षणात दु:खामध्ये बदलला

Published by : Varsha Bhasmare

नवरा-नवरीचं लग्न झालं. दोन्ही कुटुंब आनंदात होती. सर्व विधी पार पडून नवरी मुलीला सासरी आणलं. पण मधुचंद्राच्या रात्री असं काही झालं की, दोन्ही कुटुंबांचा आनंद क्षणात दु:खामध्ये बदलला. हनीमूनच्या रात्री नवरदेवाने नव्या नवरीकडे एक मागणी केली, तिने ती मान्य करण्यास नकार दिला. बस्स, एवढ्यावरुन पारा चढलेल्या नवरदेवाने हातोडीचे घाव घालून नवरी मुलीला संपवण्याचा प्रयत्न केला. मूळापासून हादरवून सोडणारी ही घटना तामिळनाडूच्या चेन्नईमधील आहे. पुरासैवक्कम येथील पार्थसारथी स्ट्रीटवर राहणाऱ्या ऑगस्टीन जोशुआचं तिरुवल्लूर येथे राहणाऱ्या 24 वर्षीय युवतीसोबत लग्न झालं. मॅट्रीमोनियल वेबसाइटवरुन हे लग्न झालेलं. 23 नोव्हेंबर 2025 रोजी हे लग्न झालेलं. लग्नानंतर नवरा नवरी मुलीला आपल्या घरी घेऊन आला. नवरीच जोरदार स्वागत झालं. सर्व प्रथा, परंपरा, विधी झाल्यानंतर नवरा-नवरी दोघे बेडरुममध्ये गेले.

बेडरुममध्ये नवरदेव जोशुआ नवरीच्या जवळ जाऊन बसला. हे अरेंज मॅरेज होतं. त्यामुळे नवरी मुलीची इच्छा होती की, पहिले एक-दोन दिवस दोघांनी फक्त एकमेकाशी बोलावं. संवाद वाढवावा. पण नवरदेवाला शारीरिक संबंध ठेवायचे होते. नवरी म्हणाली की, आपण आधी एकमेकाला समजून घेऊया. हे नवरदेव जोशुआला पटलं नाही. तो हट्टाला पेटला. नवरीने शरीरसंबंधांसाठी नकार दिला. त्यावेळी जोशुआ चिडून दुसऱ्या खोलीत निघून गेला.

नवरदेव जोशुआला हे पटलं नाही

जोशुआ दुसऱ्या खोलीतून हातोडा घेऊन आला. त्याने नवरीवर हातोड्याने अनेक वार केले. नवरी मुलगी रक्ताच्या थारोळ्यात तिथे कोसळली. नवरदेवाला वाटलं की, नवरीचा मृत्यू झालाय. म्हणून तो तिथून पळून गेला. सकाळी सासरच्या मंडळींना नवरी मुलगी खोलीत रक्ताच्या थोराळ्यात पडलेली दिसली. तिला तात्काळ रुग्णालयात हलवलं.

लग्नाच्या रात्री तिला जोशुआच सत्य समजलं

जोशुआला हुंड्याविना लग्न करायचं होतं, म्हणून मी जोशुआसोबत लग्न केलं. पण लग्नाच्या रात्री तिला जोशुआच सत्य समजलं. जोशुआचे अनेक महिलांसोबत संबंध आहेत असं नवरी मुलगी म्हणाली. आता नव्या नवरीने जोशुआ सोबत राहण्यास नकार दिला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा