ताज्या बातम्या

US Shutdown : अमेरिकेत शटडाउनचं संकट...; कामकाज बंद, शटडाऊन म्हणजे काय?

अमेरिकन सिनेटने मंगळवारी संध्याकाळी कोणताही निधी ठराव मंजूर न करता तहकूब केले, ज्यामुळे ट्रम्प (Donald Trump) यांच्या सरकारचे कामकाज बंद म्हणजेच शटडाऊन करण्यात आले आहे.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • ट्रम्प यांच्या सरकारचे कामकाज बंद म्हणजेच शटडाऊन

  • शटडाऊन म्हणजे काय?

  • शटडाऊनचा काय परिणाम होईल?

अमेरिकन सिनेटने मंगळवारी संध्याकाळी कोणताही निधी ठराव मंजूर न करता तहकूब केले, ज्यामुळे ट्रम्प (Donald Trump) यांच्या सरकारचे कामकाज बंद म्हणजेच शटडाऊन करण्यात आले आहे. सरकारी काम थांबल्याने लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना तात्पुरते वेतन मिळणार नाही. तसेच सामाजिक सुरक्षा आणि इतर लाभ वितरणावरही परिणाम होऊ शकतो. आता शटडाऊन म्हणजे काय? त्याचे होणारे परिणाम काय याबद्दल जाणून घेऊया…

रिपब्लिकन खासदारांनी २१ नोव्हेंबरपर्यंत सरकारला तात्पुरते निधी देण्यासाठी एक विधेयक मांडले होते, परंतु ते मंजूर होऊ शकले नाही. डेमोक्रॅटिक खासदारांनी या विधेयकाला विरोध केला, त्यानंतर ट्रम्प सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात पहिल्यांदाच सरकारी निधी थांबवण्यात आला आणि शटडाऊनला सुरूवात झाली. मंगळवारी संध्याकाळी निधी विधेयकावर मतदान झाले, जे ५५-४५ च्या फरकाने मंजूर होऊ शकले नाही. सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाला विधेयक मंजूर करण्यासाठी किमान ६० मतांची आवश्यकता होती.

शटडाऊन म्हणजे काय?

अमेरिकेचे आर्थिक वर्ष १ ऑक्टोबरपासून सुरू होते. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला, सरकार एक बजेट तयार करते आणि सरकारी निधी कुठे खर्च करायचा हे ठरवते. जर अमेरिकन काँग्रेसने अंतिम मुदतीपर्यंत संघराज्य सरकारला निधी देण्याचे विधेयक मंजूर केले नाही, तर सरकारी कामकाज बंद होते. अर्थसंकल्पावरून असे तणाव अमेरिकन (Americal Goverment) राजकारणात सामान्य आहेत आणि अनेक प्रसंगी, निधी विधेयके मंजूर न झाल्यामुळे अमेरिकन सरकारचे कामकाज ठप्प झाले आहे.

संपूर्ण वाद काय आहे?

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे सरकार संघराज्य सरकारच्या खर्चात कपात करत आहे आणि गेल्या काही महिन्यांत संघराज्य सरकारचा खर्च कमी करण्यासाठी अशी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. तथापि, ओबामा आरोग्य सेवा अनुदान कार्यक्रमाबाबत सत्ताधारी रिपब्लिकन पक्ष आणि विरोधी डेमोक्रॅट पक्ष यांच्यात मतभेद आहेत. डेमोक्रॅटिक खासदार ओबामा आरोग्य सेवा अनुदान वाढवू इच्छितात, परंतु रिपब्लिकन पक्ष यासाठी तयार नाही. यामुळेच निधी विधेयकावर एकमत होऊ शकले नाही. शटडाऊन थांबवण्यासाठी सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये चर्चा झाली परंतु एकमत होऊ शकले नाही.

शटडाऊनचा काय परिणाम होईल?

अमेरिकेत शटडाऊन म्हणजे सरकारकडे खर्च करण्यासाठी पैसे नाहीत असा होतो. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासह सर्व सरकारी खर्च थांबतात. वैद्यकीय सेवा, सीमा सुरक्षा आणि हवाई सेवा यासारख्या आपत्कालीन सेवा वगळता इतर सर्व सेवा विस्कळीत होऊ शकतात. गेल्या ५० वर्षांत अमेरिकेत २० वेळा शटडाऊन झाले आहेत.

२०१९ मध्ये सर्वात मोठा शटडाऊन ३५ दिवस चालला. शटडाऊनमुळे अंदाजे ७,५०,००० संघीय कर्मचाऱ्यांना पगाराशिवाय काम करावे लागले होते, ज्यामुळे अनेक आवश्यक सेवा विस्कळीत झाल्या. शटडाऊनमुळे अमेरिकन सरकारचे अन्न मदत कार्यक्रम, संघीय अनुदानित शाळा, विद्यार्थी कर्जे आणि राष्ट्रीय उद्याने देखील थांबतील. शटडाऊनचा अमेरिकन अर्थव्यवस्थेवरही परिणाम होईल आणि तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, यामुळे अमेरिकेच्या आर्थिक वाढीमध्ये दर आठवड्याला ०.१ ते ०.२ टक्क्यांनी घट होऊ शकते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Shilpa Shetty-Raj Kundra : राज कुंद्रा व शिल्पा शेट्टीला हायकोर्टाकडून झटका! परदेश प्रवासाला हायकोर्टाचा 'ना'

Ajit Pawar Meet's Sharad Pawar : मोठी बातमी! अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, तासभर काय घडलं?

Dussehra 2025 Wishes : आपल्या नात्यात आणा नवीन गोडवा! दसऱ्यानिमित्त आपल्या प्रियजनांना Whatsapp Status, Facebook द्वारे पाठवा 'या खास शुभेच्छा संदेश

Manoj Jarange Patil Health Update : जरांगेंची तब्येत खालावली असून तातडीने रुग्णालयात दाखल! उद्याच्या दसरा मेळाव्याबाबत मोठी अपडेट