ताज्या बातम्या

Cyber Crime News : या मुलीच्या चातुर्याची दाद दिली! सायबर चोरालाच फसवलं जाळ्यात

सायबर चोराने एका अल्पवयीन मुलीला फोन करुन फसवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्या मुलीच्या चातुर्याने तो स्वत: त्या मुलीच्या जाळ्यात अडकला.

Published by : Prachi Nate

आजकाल लोकांकडून ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रत्येकाने खूप सावध राहण्याची गरज आहे. अनोळखी व्यक्तींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कोणतीही पडताळणी न करता कोणताही व्यवहार करण खुप मोठ नुकसान करु शकतं. सायबर गुन्हेगार विविध प्रकारची शक्कल लढवून सर्वसामान्यांना लूटण्याचा प्रयत्न करत असतात.

फोनवर चुकून पैसे पाठवण्यात आलं तसेच तुमचा अकाउंट हॅक झालाय, इतकचं नव्हे तर तुमच्या नावाने आलेलं पार्सल कस्टममध्ये अडकलंय, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बहाण्याने सायबर गुन्हेगार सामान्य व्यक्तीचा खिशा खाली करतात. असाच एक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. एका हुशार मुलीने तिच्या चातुर्याने सायबर गुन्हेगाराला पाणी पाजलं आहे. तिच्या हुशारीवर चक्क चोरानेच तिचं कौतुक केलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सायबर गुन्हेगाराने एका अल्पवयीन मुलीला फोन केला आणि तो तिच्या वडिलांचा मित्र असल्याचं सांगितलं. त्यानंतर तुझ्या वडिलांनी मला तुझ्या UPI अकाउंटमध्ये पैसे पाठवायला सांगितले असं म्हणत तिला फसवण्याचा प्रयत्न करु लागला. त्यानंतर ती मुलगी त्याच्या प्रत्येक बोलण्याचा होकार देते. तो तिला सुरुवातीला 10,000 रु पाठवतो, त्यानंतर तिला तसा SMS देखील येतो.

मात्र, हा SMS कोणत्या बँकेकडून आलेला नसून तो एका मोबाईल नंबरवरुन केलेला टेक्स्ट SMSअसतो. त्यानंतर तो पुन्हा तिला 2 हजार रुपये पाठवणार बोलून तिला 20 हजार रुपये पाठवतो. यावेळी देखील पर्सनल नंबरवरुन पैसे पाठवल्याचा फक्त मॅसेज त्या मुलीला केलेला असतो. त्यामुळे तो माणूस तिला फसवण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्या मुलीच्या लक्षात येतं. त्यानंतर ते 20 हजार चुकून गेल्याचं तो व्यक्ती तिला म्हणतो.

त्यानंतर तो तिला म्हणतो, तू 12,000 रुपये स्वतःजवळ ठेवून बाकीचे 18,000 रुपये त्याला परत पाठवण्यास सांगतो. त्यानंतर ती मुलगी आपली हुशारी वापरुन त्यानेच पाठवलेला मॅसेज कॉपी करुन त्यात 18 हजार एडिट करून त्याला तो मॅसेज पाठवला. त्यानंतर ती मुलगी म्हणाली, घ्या काका मी पण तुम्हाला 18,000 रुपये पाठवले. त्यानंतर त्या व्यक्तीला हे समजून कळले की, ही मुलगी शेराला सव्वा शेर आहे. तो तिचं कौतून करत तिला म्हणला, मी तुला मानले, बेटा आणि फोन कट केला. यानंतर त्या मुलीवर नेटकऱ्यांकडून कमेंटमध्ये जोरदार कौतूकांचा वर्षाव होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय