Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : राजकारणात सध्या सुरू असलेल्या घडामोडींवर संजय शिरसाट यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. "पडझड ही उबाठा गटाची झाली आहे, राज ठाकरेंची नाही," असे ठाम मत व्यक्त करत त्यांनी आजच्या कार्यक्रमातील अनेक राजकीय संकेत अधोरेखित केले.
संजय शिरसाट यांनी सांगितले की, "राज ठाकरे साहेबांचे सर्वच पक्षांशी चांगले संबंध आहेत. ते सर्वांना भेटतात. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला ते झेंडा नव्हता म्हणून ते उपस्थित होते यावरून त्यांची समन्वयक भूमिका स्पष्ट होते."
त्याचबरोबर त्यांनी हेही नमूद केले की, जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाली, तर महाविकास आघाडीचे भवितव्य धोक्यात येईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला युतीसंदर्भात निर्णय घ्यायचा असल्यास, त्यांना आपल्या पक्षातील वरिष्ठांचे म्हणणे ऐकावे लागेल. आजच्या कार्यक्रमातील एक महत्त्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरेंच्या भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी कुठेही टाळ्या वाजवल्या नाहीत, ज्यामुळे त्यांच्या गंभीर भूमिकेची चर्चा रंगली आहे. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काळात ठाकरे-राज युती होणार का, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.