बुलेट ट्रेनसाठीचं देशातील पहिलं रेल्वे स्टेशन तयार झालं आहे. पहिली रन 2028 ला गुजरातमध्ये होणार, तर 2030 मध्ये मुंबईत बुलेट ट्रेन रन होण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाला भारतीय पायाभूत सुविधांमधील एक मैलाचा दगड संबोधलं आहे. भारत हा हाय-स्पीड रेल्वे प्रणाली चालवणाऱ्या सुमारे 15 देशांच्या यादीत सामील होणार आहे. यामुळे अनेक रोजगार आणि नोकऱ्याही निर्माण होणार.