महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून महामंडळाच्या महत्त्वानुसार अ, ब, क वर्गवारी केली जाणार आहे. सर्वाधिक आमदार असल्याने भाजपच्या वाट्याला 48 टक्के पदे येणार आहेत. शिवसेनेच्या वाट्याला 29 टक्के, तर राष्ट्रवादीला 23 टक्के महामंडळ मिळणार आहेत. राज्यात एकूण 138 महामंडळांमध्ये 785 सदस्य संख्या आहे. महायुतीच्या समन्वय समितीत शिक्कामोर्तब झाला आहे.