ताज्या बातम्या

अरेच्या आता शेळ्यांनाही रेनकोट; शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल

अकोले तालुक्यातील आदिवासी पाट्यातील बहुसंख्य ठाकर समाजातील कुटुंब शेळीपालन हा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत असतात . तालुक्यातील पश्चिमेकडील आदिवासी पट्ट्या असलेल्या अतिदुर्गम घाटघर , उडदावणे, पांजरे आणि आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेळी पालक आहेत .

Published by : Siddhi Naringrekar

आदेश वाकळे, संगमनेर

पावसाळा म्हटले की त्यापासून बचाव करण्यासाठी माणसं छत्री किंवा रेनकोटचा वापर करतात. हे आपल्याला माहित आहे. मात्र तुम्ही कधी पाहिले आहे का की शेळ्यांनी रेनकोट घातलाय. नाही ना. तर शेळ्यांसाठी चक्क रेनकोट तयार करण्यात आले आहे.

अकोले तालुक्यातील आदिवासी पाट्यातील बहुसंख्य ठाकर समाजातील कुटुंब शेळीपालन हा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत असतात . तालुक्यातील पश्चिमेकडील आदिवासी पट्ट्या असलेल्या अतिदुर्गम घाटघर , उडदावणे, पांजरे आणि आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेळी पालक आहेत .पावसाळ्यात प्रचंड थंडी आणि वारा मोठ्या प्रमाणावर पडणारा पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणावर शेळ्या मरण पावतात. थंडी आणि पावसापासून बचाव होण्यासाठी शेळ्यांच्या पाठीवर खतांच्या मोकळ्या गोण्या धुवून स्वच्छ केल्यानंतर त्यापासून बनवलेले रेनकोट प्रत्येक शेळीला बांधण्यात आलेले आहेत.

ही अनोखी शक्कल येथील शेळी पालकांनी शोधली आहे. यामुळे शेळ्यांच्या शरीरावर केसांमध्ये पाणी न जाता निथळून ते खाली पडते . शेळ्यांचा जोरदार पाऊस व थंडी वाऱ्यापासून बचाव होतो. ही अनोखी शक्कल लढवणारे ठाकर समाजातील ही गरीब कुटुंब माणसांप्रमाणेच शेळ्यांनाही संरक्षण देताना दिसत आहे. सध्या सर्वत्र रेनकोट घातलेल्या शेळ्यांचे कळप दिसत आहे. त्यामुळे जोरदार पाऊस पडत असूनही शेळ्यांना चारा खाण्यासाठी जंगलात फिरवता येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप