Aditya Thackeray On Mahayuti 
ताज्या बातम्या

'गेले काही दिवस सरकार सुट्टीवर, आदित्य ठाकरे यांचा निशाणा'

महाराष्ट्रातील नवीन मंत्र्यांनी पदभार स्वीकारण्यास विलंब झाल्याचं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरुनही सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Published by : Gayatri Pisekar

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं, मात्र आता मंत्र्यांच्या शपथविधीनंतरही महायुतीत नाराजी कायम आहे का? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. कारण मंत्रिपद मिळूनही अनेक मंत्र्यांनी आपला पदभार अद्याप स्वीकारला नाही. त्यामुळे ज्या मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही असे मंत्री जवळपास नवीन वर्षातच आपल्या मंत्री पदाचा पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे.

सोमवारी अमावस्या असल्याने अनेकांनी या दिवशी पदभार स्वीकारण्याचा टाळलं आहे. तर 31 डिसेंबरला जवळपास सर्व मंत्री हे मुंबईच्या बाहेर असून, नव्या वर्षाच्या स्वागतासाठी राज्याच्या किंवा देशाच्या बाहेर आहेत. त्यामुळे 31 डिसेंबरलाही पदभार स्वीकारण्याची शक्यता अगदीच कमी असल्याने नवीन वर्षातच हे नवीन सरकारमधील नवीन मंत्री पदभार स्वीकारतील, असं बोललं जात आहे. तर सरकार सुट्टीवर असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. बीड प्रकरणात सरकार कुणाला वाचवतंय? असा संतप्त सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. मला वाटलं होतं की मुख्यमंत्री कारवाई करतील, पण मुख्यमंत्र्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. तर भाजप महागाईच्या मुद्द्यावर बोलतच नाही, नागरिकांच्या समस्यांवर चर्चा करायला सरकार तयार नाही असा हल्लाबोलही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

गेले ५-६ दिवस महायुती सरकार सुट्टीवर असल्याचं दिसत आहे. कारण राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच. बीड आणि परभणीबद्दल सरकारकडून जी उत्तर देण्यात आली होती. त्याबाबत कोणतीही कारवाई झाल्याचं दिसत नाहीये. टाईमबाऊंड कारवाई करणार होते मात्र, तसं काही झालेलं नाहीये. मुंबईमध्येही पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याचे आपण पाहत आहोत. हवेत धूळ आणि स्मॉग, फॉग आहे मात्र, याबाबत कोणालाच काही माहिती नाही. तर याबाबत उत्तरं ही कुठून येतील असा खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू