थोडक्यात
बच्चू कडूंच्या आंदोलनाची सरकारकडून गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी आज बोलावली तातडीची बैठक
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बच्चू कडूंसोबत फडणवीस करणार चर्चा
राज्याचे मुख्य सचिव, 30 प्रमुख अधिकाऱ्यांसोबत जम्बो बैठक
सह्याद्री अतिथीगृहावर पार पडणार बैठक
बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राहणार उपस्थित
बच्चू कडू्ंच्या आंदोलनाची सरकारकडून गंभीर दखल घेतली आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली तात्काळ बैठक घेणार आहे. बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राहणार उपस्थित असल्याची माहिती आहे. या चर्चेंसाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. बच्चू कडूंसोबत महादेव जानकर, राजु शेट्टी, अजित नवले यांना ही चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले असून राज्याच्या मुख्य सचिवांसोबत ३० प्रमुख अधिकाऱ्यांसोबत जम्बो बैठक करणार आहे. ही बैठक सकाळी १०.३० वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.