मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची पुन्हा हाक दिली आहे. जरांगेची तोफ पुन्हा मुंबईकडे रवाना होत आहे. येत्या 29 ऑगस्टला आझाद मैदानावर मनोज जरांगे उपोषणाला सुरुवात करणार आहेत. आज सकाळी अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे निघाले आहेत. याचपार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मराठा समाजाला दिलेलं आरक्षण आज सुद्धा लागू आहे. एका समाजाला न्याय देताना कोणत्याही दुसऱ्या समाजावर अन्याय झाला नाही याकडे सुद्धा लक्ष द्यावे लागते आहे. सरकार सर्व जातीपातीचा विचार करुन त्याचा विकास करुन त्यांनासोबत घेऊन जायला पाहिजे. आपल्या लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. परंतू आपल्या आंदोलनामुळे कोणत्याही समाजातील व्यक्तीला त्रास नाही झाला पाहिजे.गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे, दरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तरी कोणाला काही इजा होणार नाही यांची काळजी आपण घेतला पाहिजे."