ताज्या बातम्या

Weather Update: थंडीची वाढती लाट! हवामान विभागाचा अंदाज

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्रात नुकताच अवकाळी पाऊस बरसून गेला असताना राज्यभर पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर नाशिक जिल्ह्यात किमान तापमान १९.५ अंश सेल्सिअस एवढे असून पुढील काही दिवसात तापमान हे २ ते ३ अंशाने वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला असून त्यानंतर तापमानात काहीशी घट होणार असल्याचेही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले आहे.

पुढील काही दिवस उत्तरेकडील भागात थंडीतून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा भागात दाट धुक्याची चादर पसरली आहे. पहाटेच्या वेळेस दाट धुके आणि गारठ्यामुळे सकाळी घरातून बाहेर पडणं कठीण झालं आहे. उत्तर भारतात कडाक्याची थंडी कायम असून यासोबतच दाट धुक्याचा परिणामही दिसून येत आहे. दिल्ली एनसीआरपासून उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानपर्यंत कडाक्याची थंडी जाणवत आहे. यंदाच्या थंडीने या हंगामातील सर्व विक्रम मोडीत काढले असून देशातील अनेक भागांच्या किमान तापमानात सातत्याने घट होत आहे.

दरम्यान, आयएमडीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अनेक ठिकाणी किमान तापमान तीन ते सात अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले गेले असून याशिवाय पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसभर धुके दिसून आले. तसेच पश्चिम बंगालमध्ये दाट धुके दिसून आले. दिल्लीत आज सकाळीही दाट धुके पाहायला मिळाले. आज उत्तरेकडील राज्य पंजाब, हरियाणा, चंदीगड, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थान या भागात दाट धुके पसरण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. दरम्यान पुढील 48 तासात काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...