लोकशाही मराठीच्या व्यासपीठवर आज 11 ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्रच्या विकासाचा संवाद पार पडत आहे. या कार्यक्रमात गुणवंतांचा गौरव केला जाणार आहे. लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे "पश्चिम महाराष्ट्र संवाद 2025" या कार्यक्रमाचे आयोजन द ऑर्किड हॉटेल पुणे येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दल चर्चा केली जाणार आहे. यासह पश्चिम महाराष्ट्रच्या भूमीतून आलेल्या दिग्गज मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमात केला जाणार आहे. कार्यक्रमात रुपाली ठोंबरेपाटील यांनी महिला आयोगाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला. याचपार्श्वभूमिवर चाकणकर यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.
"गेल्या 20 वर्षापासून राजकारणात आहे. राजकारणाच्या चढ उतारामध्ये मी स्वकर्तृत्वावर इथपर्यंत आले असून अगदी बजतगटापासून सुरु झालेला प्रवास हा प्रवास राज्य महिला आयोगापर्यंत पोहचला. .यामागे अनेक चढ उतार तसेच सुखाचे दुखाचे क्षण आहेत. या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही सर्व माणसांना बरोबर घेऊन जातो. ट्रोल करण विकृत लोकांची मानसिकता असून आता त्यांची आम्हाला सवय झाली आहे. काल जे माझ्यावर टीका करत होते. ते आज माझ्यासोबत आहेत. सगळ्यांना बरोबर घेऊन चालणं हा आमचा स्वभाव असल्याने माझी महाराष्ट्रातली महिला संघटना सर्वात मोठी आहे. याचं आम्हाला कौतुक आहे. या गोष्टींमध्ये मैत्री जे जे येत राहतील त्यांनासोबत घेऊन जायला तयार आहे. "