छत्रपती शिवाजी महाराज हे संपुर्ण महाराष्ट्राचे किंबहुना भारताचे आराध्य दैवत.. शौर्य , पराक्रम यांचा तेजस्वी स्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जगाच्या इतिहासातील सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज्यांचा इतिहास आजच्या भावी पिढीला कळावा , हे अत्यंत गरजेचे आहे. त्यांची महती देशभर पसरावी यासाठी केवळ मराठी माध्यमातील इयत्ता चौथीपर्यंत असणारा शिवाजी महाराजांचा इतिहास हा संपुर्ण देशभर सर्वाना परिचित होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांना आता अभ्यासता येणार आहे. त्यांचा समावेश राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात केला जाणार आहे.
पुणे महापालिका, संवाद पुणे यांच्यातर्फे गणेश कला-क्रीडा मंच यांच्या वतीने आयोजित ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ हे प्रदर्शन भरवले गेले होते, त्यावेळी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. ‘महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशपातळीवर सर्वांना माहित असणे खुप गरजेचे आहे. या साठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास केंद्रीय माध्यमिक मंडळाच्या (सीबीएसई) शाळांमध्ये शिकविण्यात यावा अशी मागणी होत होती. या संदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये केंद्राचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे ही मागणी केली असता त्यांनी यासाठी मान्यता दिली आहे. असे मत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले.
या वेळी महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, ‘बालभारती’चे संचालक कृष्णकुमार पाटील, किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.इंग्रजीसह विविध माध्यमांतील खासगी शाळा आणि जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील अंतर कमी करण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता शिवरायांचा इतिहास केंद्रीय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे.