ताज्या बातम्या

Farmer Suicide : महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचं भयावह वास्तव;एनसीआरबीचा धक्कादायक अहवाल

नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी) ने शेतकरी (Farmer Suicide) आत्महत्यांबद्दल एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार, २०२३ मध्ये शेतीशी संबंधित १०,००० हून अधिक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत, ज्यामध्ये शेतकरी आणि शेतमजूर दोघेही होते.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येच भयावह वास्तव

  • २०२३ मध्ये देशात १ लाख ७० हजारांहून अधिक आत्महत्यांची नोंद

  • सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात (३८.५%) आणि कर्नाटकात (२२.५%) झाल्या

नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी) ने शेतकरी (Farmer Suicide) आत्महत्यांबद्दल एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार, २०२३ मध्ये शेतीशी संबंधित १०,००० हून अधिक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत, ज्यामध्ये शेतकरी आणि शेतमजूर दोघेही होते. सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात (३८.५%) आणि कर्नाटकात (२२.५%) झाल्या आहेत.

अहवालात म्हटले आहे की २०२३ मध्ये देशात १ लाख ७० हजारांहून अधिक आत्महत्यांची नोंद झाली होती, ज्यामध्ये केवळ शेतकरीच नाही तर बेरोजगार तरुण आणि व्यवसायाशी संबंधित लोकांचाही समावेश होता. दरम्यान, या अहवालात पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, झारखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि गोवा यासह काही राज्यांमध्ये आत्महत्या झाल्याची नोंद नाही.

एनसीआरबीच्या अहवालानुसार, शेतकरी आणि शेतमजूर यांचा आत्महत्यांमध्ये समावेश आहे. आत्महत्या केलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांची एकूण संख्या १०,७८६ इतकी आहे, ज्यामध्ये ४,६९० शेतकरी आणि ६,०९६ शेतमजूर आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये केवळ पुरुषच नाही तर महिलांचाही समावेश आहे.

यातील धक्कादायक आणि तितकीच चिंताजनक गोष्ट म्हणजे सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्र (३८.५%), कर्नाटक (२२.५%), आंध्र प्रदेश (८.६%), मध्य प्रदेश (७.२%) आणि तामिळनाडू (५.९%) या राज्यात झाल्या आहेत. तथापि, अशी काही राज्ये आहेत जिथे शेतकरी आत्महत्या झाल्या नाहीत, ज्यात पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, झारखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, चंदीगड, दिल्ली आणि लक्षद्वीप यांचा समावेश आहे.

अहवालात आत्महत्या करणाऱ्यांच्या आर्थिक स्थितीचाही आढावा घेण्यात आला आहे. त्यामध्ये असं आढळून आले की, २०२३ मध्ये बहुतेक आत्महत्याग्रस्तांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी होते. अहवालात असंही अधोरेखित करण्यात आलं आहे की, बेरोजगारी ही केवळ शेतकऱ्यांमध्येच नाही तर तरुणांमध्येही आत्महत्यांचे एक प्रमुख कारण आहे. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Shilpa Shetty-Raj Kundra : राज कुंद्रा व शिल्पा शेट्टीला हायकोर्टाकडून झटका! परदेश प्रवासाला हायकोर्टाचा 'ना'

Ajit Pawar Meet's Sharad Pawar : मोठी बातमी! अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, तासभर काय घडलं?

Dussehra 2025 Wishes : आपल्या नात्यात आणा नवीन गोडवा! दसऱ्यानिमित्त आपल्या प्रियजनांना Whatsapp Status, Facebook द्वारे पाठवा 'या खास शुभेच्छा संदेश

Manoj Jarange Patil Health Update : जरांगेंची तब्येत खालावली असून तातडीने रुग्णालयात दाखल! उद्याच्या दसरा मेळाव्याबाबत मोठी अपडेट