Delhi Blast  Delhi Blast
ताज्या बातम्या

Delhi Blast : धक्कादायक! स्फोट झालेली 'ती' कार काश्मीरमधील तारिकला विकली होती, Hyundai i-20 कारचं रहस्य काय?

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या भीषण स्फोटाने देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेत ८ जणांचा मृत्यू तर २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. स्फोटाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून तपास सुरू आहे.

Published by : Riddhi Vanne

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या भीषण स्फोटाने देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेत ८ जणांचा मृत्यू तर २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. स्फोटाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून तपास सुरू आहे. दरम्यान, चौकशीत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ज्या हुंडई आय-२० कारमध्ये स्फोट झाला, ती अनेक वेळा विक्री–खरेदी झाली होती आणि तिचा पुलवामाशीही संबंध असल्याचे समोर आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, कारचे व्यवहार बनावट कागदपत्रांच्या आधारे झाले होते, त्यामुळे खरी मालकी निश्चित होऊ शकलेली नाही. या पार्श्वभूमीवर या कटामागील हेतूंबद्दल गंभीर शंका व्यक्त केल्या जात आहेत. सुरुवातीला ही कार गुरुग्राममधील सलमान यांच्या नावावर होती, आणि त्यांनी ती विकल्याची माहिती मिळाली होती. कारची नोंद गुरुग्राममध्ये असून, २० सप्टेंबर रोजी फरिदाबाद येथे चुकीच्या ठिकाणी पार्क केल्यामुळे तिच्यावर दंडही करण्यात आला होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा