हिंगोलीच्या हिवरखेडा गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत होती. लोकशाही मराठीने त्यासर्व घटनेची दखल घेत बातमी केली. बातमी पाहताच पाणीपुरवठा विभागाने हिवरखेडा गावातील पाण्याच्या समस्येकडे लक्ष दिले आहे. गावातील पाण्याच्या टाकीपासून पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू झाले आहे. लोकशाही मराठीच्या बातमीनंतर अनेक दिवसापासून रखडलेल्या जलजीवन मिशनच्या कामाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.