इराण आणि इस्रायल यांच्यातील वाद तीव्र झाला आहे. यामध्ये दोन्ही देशात मोठ्या प्रमाणात जीवीतहानी झाली आहे. इराण आणि इस्रायलमध्ये कडवी झुंज असलेली बघायला मिळत आहे. इराणवर मोठ्या प्रमाणात निर्बंध आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता आहे. मात्र इराणकडे मिसाईल आणि ड्रोन तंत्रज्ञान प्रगत आहे. त्यामुळे यामार्गे इराण इस्रायलशी लढा देऊ शकतो.
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्ध पातळीवर भारत सरकारकडून एक विशेष अभियान सुरू करण्यात आलं आहे. इराणमध्ये भातरतातील काही नागरिक अडकले आहेत. त्यांच्या जीवाला कोणतीही हानी पोहचू नये यासाठी भारत सरकारने ऑपरेश सिंधू अभियानाला सुरुवात केली आहे. ऑपरेश सिंधू अंतर्गत भारतीय दूतावासने 17 जून रोजी उत्तर इराणमधून 110 भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं असून त्यांना सध्यासाठी आर्मोनियाची राजधानी असलेल्या येरेवन शहरात दाखल केलं आहे.
इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांनी इराणमधील भारतीय दूतावासाच्या संर्पकात राहवं असं आवाहन परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे, त्यासाठी हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना आज विमानानं येरेवनहून भारतात सुखरुप आणले जाणार आहे. यादरम्यान भारताने आर्मोनिया आणि इराण सरकारचे आभार मानले असून ऑपरेशन सिंधू अंतर्गत अनेक भारतीयांचे जीव वाचवले आहे.
या संदर्भात भारत सरकारच्या वतीनं माहिती देण्यात आली आहे.
तेहरानमधील भारतीय दूतावासाचे आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक: +98 9128109115, +98 9128109109
व्हाट्सअॅपसाठी: +98 901044557, +98 9015993320, +91 8086871709
ईमेल- cons.tehran@mea.gov.in
नवी दिल्ली येथील परराष्ट्र मंत्रालयाने स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाचे हेल्पलाइन क्रमांक
800118797 (टोल फ्री), +91-11-23012113, +91-11-23014104, +91-11-23017905
ईमेल- situationroom@mea.gov.in