Pune Car Accident Case 
ताज्या बातम्या

Pune Porsche Car Accident : अल्पवयीन आरोपीची ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी, जामीन रद्द

पुण्यातील विकसक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार चालवून कल्याणी नगर परिसरात दोन जणांचा बळी घेतला होता.

Published by : Naresh Shende

Pune Car Accident Case : पुण्यातील विकसक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार चालवून कल्याणी नगर परिसरात दोन जणांचा बळी घेतला होता. या हिट अँड रन प्रकरणात आज न्यायालयाने आरोपी विशाल अग्रवालला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दुसरीकडे, अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात १४ दिवस (५ जूनपर्यंत) ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय बाल हक्क मंडळाने दिला आहे. या प्रकरणात अल्पवयीनचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याला रिमांड होममध्ये ठेवण्याचा निर्णय घोषित करण्यात आला आहे. संपूर्ण तपास होईपर्यंत त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात येणार आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर अल्पवयीन अज्ञान आहे की सज्ञान याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

पोर्शे कार जप्त करण्याचा पुणे RTO चा निर्णय

या अपघात प्रकरणात कारची नोंदणी एका वर्षासाठी रद्द करण्यात आली आहे. तसच अल्वयीन विरोधातही परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत वाहन चालवण्याचा परवाना आरोपीला दिला जाणार नाही. तसच या आलिशान कारची तात्पुरती नोंदणी वाहन मोटर कायद्याच्या तरतुदीनुसार रद्द करण्यात आली आहे. एक वर्षासाठी कोणत्याही परिवहन कार्यालयात नोंदणी करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पोर्शे कार एका वर्षासाठी जप्त करण्यात येणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय