पुण्यातील मुळशी येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आज, बुधवारी कोर्टात आरोपींच्या वकिलांच्या वतीने बाजू मांडण्यात आली आहे. तिच्या मृत्यू प्रकरणी अटकेत असलेल्या तिच्या सासू, नवरा आणि नणंदेला एक दिवसाची पोलीस कोठडी तर सासरे आणि दीराला ३१ मे पर्यंतची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. दरम्यान, हगवणे कुटुंबियांच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलांनी आज, बुधवारी कोर्टात वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवले आहे. वैष्णवीचे बाहेर नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते. तिथून नकार आल्यामुळेच तिने आत्महत्या केली असावी, असे वकिलांनी म्हटले आहे. शिवाय बायकोला थोपाडीत मारणे हा छळ होत नाही, तर प्लास्टिक पट्टीने मारणे म्हणजे मारहाण नव्हे, असाही युक्तीवाद त्यांनी केला आहे.