“आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी भुईसपाट होणार आहे. भाजप- महायुती 51 टक्क्यांपेक्षा जास्त मते जिंकणार आहे,” असा मोठा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.
बावनकुळे म्हणाले,
“आता निवडणुका झाल्यानंतर तुम्ही हरलात, तर पुन्हा काय सांगणार? निवडणूक हारल्यावर म्हणाल की मतदार यादी चुकीची होती? म्हणूनच मी सांगतो – आता मतदार यादी पाहण्याची वेळ आली आहे. आजही संधी आहे. आता काय म्हणणार? मतदार चुकले, हे सांगण्यापेक्षा मतदार यादी तपासून घ्या. मी काँग्रेस पार्टीच्या नेत्याला आव्हान देतो. आता तुम्ही मतदार यादी बघून घ्या. पुन्हा केदार महानगरपालिका, जिल्हा परिषद, सर्व ठिकाणी आत्ताच ऑब्जेक्शन घ्या. नाहीतर उद्या हरल्यावर पुन्हा म्हणाल की मतदार यादी चुकीची होती. काँग्रेसच्या नेत्यांना यशोमित ताई म्हणताना घ्या . ऑब्जेक्शन घ्या, ऑब्जेक्शन वडवार घ्या.”
महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं की,
“आम्ही यावेळी ज्या निवडणुका जिंकणार आहोत त्यात महायुतीला 51 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळणार आहेत. आता मतदार दुरुस्त करून घ्या, ऑब्जेक्शन घ्या – वेळ आहे. आता का घेत नाही?” त्यांच्या या वक्तव्यामुळे निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.