Bihar Election Result  
ताज्या बातम्या

Bihar Election Result : बिहारमध्ये महागठबंधनचा ‘या’ कारणांमुळे सुपडासाफ

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळाले आहे. एनडीएने २०७ जागांवर विजय मिळवला आहे.

Published by : Varsha Bhasmare

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळाले आहे. एनडीएने २०७ जागांवर विजय मिळवला आहे. दरम्यान महाआघाडीचा दणदणीत पराभव झाला आहे. दरम्यान महागठबंधनला केवळ ३० जागा मिळाल्या. दरम्यान आज आपण महाआघाडीच्या पराभवाची ५ मुख्य कारणे जाणून घेऊयात.

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप, जेडीयू पक्षाने जोरदार कामगिरी केली आहे. त्यामुळे विद्यमान सरकारने आपली सत्ता राखली आहे. नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. चिराग पासवान यांचा पक्ष २२ जागांवर पुढे आहे. त्यामुळे एनडीए प्रचंड मोठ्या बहूमताने बिहारमध्ये सरकार स्थापन करताना दिसून येत आहे. महाआघाडीचा दणदणीत पराभव झाला आहे. यामगची कारणे जाणून घेऊयात.

1. बिहारमध्ये एनडीएच्या विजयामागे महिलांचा मोठा सहभाग असल्याचे म्हटले जात आहे. या निवडणुकीत मतदानाचा आकडा वाढल्याचे दिसून आले. निवडणुकीआधी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘महिला रोजगार योजना’ आणली. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात १० हजार रुपये जमा करण्यात आले होते.

२. बिहारमध्ये नितीश कुमार यांचे वर्चस्व गेल्या कित्येक वर्षांपासून पाहायला मिळते. गेले अनेक वर्षांपासून नितीश कुमार हे नाव बिहारच्या राजकारणात आघाडीवर आहे. अनेक वर्षांपासून नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत. जेव्हा जेव्हा नितीश कुमार यांची राजकीय कारकीर्द संपणार अशी टीका केली गेली, तेव्हा त्यांनी जोरदार कमबॅक केल्याचे दिसून आले.

३. मोदी- शहा यांचा प्रचार देखील या बिहार विधानसभा निवडणुकीत महत्वाचा ठरला आहे. त्यांचा प्रचाराला यश आल्याने एनडीएने प्रचंड मोठे बहुमत गाठले आहे. जंगलराज नको असा प्रचार करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि भाजपच्या स्टार प्रचारकांनी केलेला प्रचार हा एनडीएच्या विजयाचा महत्वाचा मुद्दा ठरला आहे.

४. बिहारमध्ये एनडीएच्या विजयाचे कारण ठरले ते म्हणजे केंद्रातील एनडीए म्हणजेच मोदी सरकार. केंद्रात आणि राज्यात एकच पक्षाचे सरकार असल्यास विकास करणे सोपे होते किंवा सहजतेने विकास होतो असे समजले जाते. नितीश कुमार हे एनडीएमधील नेते आहेत. दरम्यान भरमध्ये अजूनही मतमोजणी सुरू आहे. यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा