महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस ATS ) पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ठाण्यातील तीन व्यक्तींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुंबईतील एका महत्त्वाच्या संस्थेत काम करत होता. त्याने सांगितले की, पाकिस्तानी एजंटने फेसबुकवर महिला असल्याचे भासवून आरोपीशी मैत्री केली होती. त्याचवेळी, पोलिसांनी आणखी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची नावे अद्याप उघड केलेली नाहीत. त्यांनी सांगितले की, आरोपीने नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत व्हॉट्सॲप Whatappद्वारे एका 'पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणे' Pakistani Spy Arrested ला एका महत्त्वाच्या आस्थापनेबद्दलची संवेदनशील माहिती शेअर केली होती, अशी प्राथमिक माहितीसमोर आली आहे.