ताज्या बातम्या

Mahayuti Dispute : महायुतीत मिठाचा खडा! स्थानिक निवडणुकीसाठी भाजपशी युतीबाबत शिवसेनेत विरोध ?

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महायुतीतच धुसफूस सुरु असल्याचं चित्र समोर आलं आहे. भाजपशी युतीबाबत शिवसेनेत काहीसा विरोध पहायला मिळतो आहे.

Published by : Prachi Nate

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महायुतीतच धुसफूस सुरु असल्याचं चित्र समोर आलं आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर युतीबाबत शिवसेनेत काहीसा विरोध पहायला मिळतो आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जिल्हा स्तरावरील आढावा बैठकांमधून हा विरोध प्रामुख्याने पहायला मिळाला. बैठकांमध्ये भाजपकडून होणाऱ्या त्रासामुळे युतीबाबत शिवसेनेतील नेत्यांमध्ये मतमतांतर असल्याचं पाहायला मिळत आहे.

त्यामुळे अनेक ठिकाणी भाजप नेत्यांकडून डिवचण्याचे प्रकार सुरू असल्याने शिवसैनिकांकडूनही स्वबळाचा नारा आता जोर धरू लागला आहे. त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्हानिहाय बैठकांमधील अहवालानंतर युती संदर्भात निर्णय मुख्यनेत्यांच्या सूचनेनंतर होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा