ताज्या बातम्या

मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला; विनायक मेटे यांची क्रांतिकारी कारकीर्द

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. वयाच्या 52व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून पुणे ते मुंबई प्रवास करताना मेटे यांचे वाहन अनोळखी वाहनावरती आदळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम दाखल करण्यात आलं होतं.

Published by : Siddhi Naringrekar

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. वयाच्या 52व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून पुणे ते मुंबई प्रवास करताना मेटे यांचे वाहन अनोळखी वाहनावरती आदळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम दाखल करण्यात आलं होतं.

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत होते. हायवेवरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला. पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही. त्यानंतर त्यानंतर एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मराठा आरक्षणासंदर्भातील महत्वाची बैठकीसाठी मुंबईला येत असतानाच त्यांचा अपघात झाला. मराठा आरक्षणासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले आंदोलने केलीत.

विनायक मेटे यांची कारकीर्द

विनायक मेटे यांचा जन्म 30 जून 1970 ला बीड जिल्ह्यातल्या राजेगाव येथे झाला. विनायक मेटे हे तरुण असतानाच सामाजिक आणि चळवळीत सहभागी झाले मराठा महासंघाच्या माध्यमातून मेटे यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.

अण्णासाहेब पाटील यांच्यासोबत मराठा महासंघात काम करत असताना विनायक मेटे हे 1996 साली भाजपच्या सरकारमध्ये विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त झाले होते. मराठा महासंघाच्या माध्यमातून त्यांनी गावागावात आपली ओळख निर्माण केली आणि एक तरुण नेतृत्व म्हणून ते बीड जिल्ह्यात पुढे आले.

त्यानंतर त्यांनी 2001 मध्ये आपली स्वतःची शिवसंग्राम ही संघटना काढली आणि संघटनेच्या विस्तारासाठी मेटे महाराष्ट्रभर फिरत होते. शिवसंग्रामच्या माध्यमातून विनायक मेटे यांनी महाराष्ट्रभर आपल्या कार्यकर्त्यांची मोट बांधली होती आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून कायम ते लढा देत होते.

संघटना काढल्यानंतर मेटे यांनी भारतीय संग्राम परिषद नावाचा आपला एक पक्ष स्थापन केला. 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून मेटे यांनी बीड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती.

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली. अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी. सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार. त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा